मंत्रिमंडळात शपथ घेतल्यानंतर १५ तासांतच मंत्रिपद सोडण्याची इच्छा व्यक्त करणारा मंत्री कोण?

Monika Lonkar –Kumbhar

सुरेश गोपी

केरळमधील भाजपचे पहिले खासदार सुरेश गोपी, यांनी रविवारी केंद्रीय राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली होती. ते आता पायउतार होण्याची शक्यता आहे.

शपथविधी

शपथविधी सोहळ्यानंतर दिल्लीतील चॅनेलशी बोलताना ते म्हणाले की, त्यांनी मंत्रिपदाची मागणी केलेली नाही आणि लवकरच या पदावरून त्यांना मुक्त केले जाईल अशी आशा आहे.

मंत्रिपद सोडण्याचे कारण

मंत्रिपद सोडण्याचे कारण सांगताना गोपी म्हणाले की, मी काही चित्रपट साइन केले आहेत आणि ते मला करायचे आहेत.

खासदार

गोपी म्हणाले, 'खासदार म्हणून काम करण्याचे माझे ध्येय आहे. मी काहीही मागितले नाही, मी म्हणालो की, मला या पदाची गरज नाही.

मी काहीही मागितले नाही, मला वाटते की मी लवकरच या पदावरून मुक्त होईल, असे ही गोपी म्हणाले.

अभिनय

सुरेश गोपी चित्रपटांशीही संबंधित आहेत. त्यांनी बालकलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये काम केले.

प्रमुख भूमिका

सुरेश गोपींनी अनेक चित्रपटांमध्ये प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. 1998 मध्ये 'कालियाट्टम' या चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे.

मोदींच्या मंत्रिमंडळात ६ वकिल, १ सीए आणि १ अभिनेता

Pm Modi Cabinet | esakal