Aarti Badade
ड्रॅगन फ्रूट हे कमी कॅलरी असलेलं, पण अत्यंत पोषणमूल्यांनी भरलेलं फळ आहे. उन्हाळ्यात शरीर ताजं आणि थंड ठेवण्यासाठी एकदम योग्य.
यामध्ये व्हिटॅमिन A, C, मॅग्नेशियम, लोह, कॅल्शियम आणि भरपूर अँटीऑक्सिडंट्स असतात – जे शरीरासाठी अत्यंत उपयुक्त आहेत.
ड्रॅगन फ्रूटमधील अँटीऑक्सिडंट्स डीएनएचं नुकसान रोखतात, जे कर्करोगासारख्या गंभीर आजारांपासून बचाव करतात.
यामध्ये असणारे फायबर्स पचनक्रिया सुधारतात, पोट साफ ठेवतात आणि भूक नियंत्रणात ठेवतात.
ड्रॅगन फ्रूट मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरू शकतं, कारण हे रक्तातील साखर संतुलित ठेवण्यास मदत करते.
यामधील अँटीऑक्सिडंट्स – फिनोलिक अॅसिड, फ्लेव्होनॉइड्स आणि बीटासानिन – वृद्धत्वाच्या लक्षणांना थांबवण्याचं काम करतात.
ड्रॅगन फ्रूट केवळ चवदारच नाही तर आरोग्यासाठीही उत्तम. ते फ्रूट सॅलडमध्ये घालून आहारात नक्कीच समाविष्ट करा.