सकाळ डिजिटल टीम
कच्च्या बटाट्याच्या रसात दाहशामक गुणधर्म असतात. यामुळे कोपर, मान, खांदे, गुडघे आणि पाठ यातील दुखण्यावर आराम मिळतो. थंडीत होणाऱ्या सांधेदुखीसाठी हा एक नैसर्गिक उपाय आहे.
बटाट्याच्या रसात फायबर्स भरपूर असतात आणि हे एक उत्तम डिटॉक्सिफायिंग एजंट आहे. यामुळे किडनी, यकृत आणि पित्ताशयाचे कार्य सुधारते. शरीरातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल बाहेर काढून रक्तप्रवाह सुधारतो.
बटाट्याचा रस त्वचेवर लावल्यास पिगमेंटेशन कमी होते आणि त्वचा स्वच्छ होते. १०-१५ दिवसात तुम्हाला त्वचेतील सुधारणा दिसू लागेल.
अपचन किंवा अॅसिडिटी झाल्यास बटाट्याचा रस उपयुक्त ठरतो. १-२ चमचे बटाट्याचा रस पाण्यात मिसळून जेवणाआधी घेतल्याने आराम मिळतो.
बटाट्याचा रस केसांमध्ये लावल्याने कोंडा कमी होतो आणि केस मजबूत आणि गडद काळे होतात. हे एक सोपा आणि घरगुती उपाय आहे.
डोळ्यांखाली सूज आणि काळी वर्तुळे कमी करण्यासाठी बटाट्याच्या रसात ओला कापसाचा बोळा लावा. हे रोज केल्याने सूज आणि काळी वर्तुळे दूर होण्यास मदत होईल.
बटाट्याचा रस पचनक्रिया सुधारण्यास मदत करतो. यामुळे शरीरातील अपघटन प्रक्रियेला मदत मिळते आणि पोटाशी संबंधित समस्या कमी होतात. रोज १-२ चमचे बटाट्याचा रस सेवन केल्याने पचनक्रिया सुधारते.