रोज फक्त १० सूर्यनमस्कार आणि मिळवा 'हे' आश्चर्यकारक फायदे

सकाळ डिजिटल टीम

सूर्यनमस्कार

रोज १० सूर्यनमस्कार केल्यास आरोग्यास कोण कोणते फायदे मिळतात जाणून घ्या?

Surya Namaskar

|

sakal 

व्यायाम

सूर्यनमस्कारातील १२ स्थितींमुळे डोक्यापासून पायाच्या नखापर्यंत सर्व स्नायूंचा व्यायाम होतो. यामध्ये स्ट्रेचिंग आणि स्ट्रेंथनिंग दोन्ही होत असल्याने शरीराला वेगळ्या व्यायामाची गरज उरत नाही.

Surya Namaskar

|

sakal

लवचिकता वाढते

हे आसन केल्याने पाठीचा कणा, हात, पाय आणि पोटाचे स्नायू ताणले जातात. यामुळे शरीराची लवचिकता (Flexibility) वाढते आणि सांधेदुखीचा त्रास कमी होण्यास मदत मिळते.

Surya Namaskar

|

sakal 

पचनशक्तीत सुधारणा

सूर्यनमस्कारातील विविध स्थितींमुळे पोटाच्या स्नायूंवर दाब पडतो आणि मसाज होतो. यामुळे पचनसंस्था सुधारते, गॅस, अपचन आणि बद्धकोष्ठतेसारख्या समस्या दूर होतात.

Surya Namaskar

|

sakal 

वजन

जर तुम्ही वेगाने सूर्यनमस्कार घातले तर ते उत्तम 'कार्डिओ' वर्कआउट ठरते. दररोज १० सूर्यनमस्कार घातल्याने पोटावरची चरबी (Belly Fat) कमी होण्यास आणि वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते.

Surya Namaskar

|

sakal 

तणाव आणि चिंता

सूर्यनमस्कार करताना दीर्घ श्वसन करणे गरजेचे असते. यामुळे मेंदूला पुरेसा ऑक्सिजन मिळतो, मज्जासंस्था शांत होते आणि मानसिक तणाव, चिंता (Anxiety) कमी होण्यास मदत होते.

Surya Namaskar

|

sakal 

आरोग्य

रक्ताभिसरण सुधारल्यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो. शरीरातील विषारी घटक (Toxins) बाहेर टाकले गेल्यामुळे त्वचेचे विकार कमी होतात आणि अकाली वृद्धत्व रोखले जाते.

Surya Namaskar

|

sakal 

रक्ताभिसरण सुधारते

सूर्यनमस्काराच्या प्रक्रियेत हृदयाची गती वाढते आणि रक्ताभिसरण सुधारते. यामुळे शरीरातील प्रत्येक पेशीला पुरेसा ऑक्सिजन आणि पोषण मिळते.

Surya Namaskar

|

sakal 

मासिक पाळी

महिलांसाठी सूर्यनमस्कार अत्यंत फायदेशीर आहेत. यामुळे हार्मोन्सचे संतुलन राखले जाते आणि मासिक पाळीशी संबंधित समस्या (उदा. अनियमितता किंवा वेदना) कमी होण्यास मदत होते.

Surya Namaskar

|

sakal 

फक्त 5 मिनिटं पुरेशी! थकवा अन् स्ट्रेस दूर करणारा घरगुती उपाय

Hot water foot soak benefits

|

Sakal

येथे क्लिक करा