सकाळ डिजिटल टीम
क्रिकेटपटू मोहम्मद सिराज व जनाई भोसले हिचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि अफेअरच्या बातम्यांनी जोर धरला.
सिराज व जनाई डेट करत आहेत, अशी सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली.
त्यानंतर दोघांनीही इंस्टाग्राम स्टोरीज पोस्ट करून अफेअरच्या अफवांचे सत्य सर्वांसमोर ठेवले.
ज्यामध्ये दोघांनीही एकमेकांना भाऊ-बहीण असे संबोधले.
पण मोहम्मद सिराजची मानलेली बहीण जनाई भोसले नक्की आहे तरी कोण ?
जनाई भोसले ही दिग्गज गायिका आशा भोसले यांची नात आहे.
जनाई देखील गायिका असून तिनेही काही गाणी रिलीज केली आहेत.
तिचे इंस्टाग्रामवर २ लाख फॉलोवर्स आहेत.