Pranali Kodre
टी२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत भारताने ७ फेब्रुवारी रोजी अमेरिकेविरुद्ध मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर २९ धावांनी विजय मिळवला.
Suryakumar Yadav Surpasses Virat Kohli
Sakal
या सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवने केलेली स्फोटक फलंदाजी भारतासाठी महत्त्वाची ठरली. त्याने ४९ चेंडूतच ८४ धावा ठोकल्या. यात १० चौकार आणि ४ षटकार मारले.
Suryakumar Yadav
Sakal
त्यामुळे सूर्यकुमार यादवला या सामन्यातील सामनावीर म्हणूनही घोषित करण्यात आले. त्यामुळे त्याच्या नावावर दोन विक्रम झाले.
Suryakumar Yadav Surpasses Virat Kohli
Sakal
सूर्यकुमार यादव टी२० वर्ल्ड कपमध्ये सामनावीर पुरस्कार जिंकणारा भारताचा केवळ दुसरा कर्णधार आहे.
Suryakumar Yadav
Sakal
यापूर्वी रोहित शर्माने २०२४ टी२० वर्ल्ड कपमध्ये कर्णधार असताना ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात सामनावीर पुरस्कार जिंकला होता.
Rohit Sharma
Sakal
याशिवाय सूर्यकुमारचा आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेट कारकिर्दीतील १७ वा सामनावीर पुरस्कार ठरला.
Suryakumar Yadav
Sakal
त्यामुळे सूर्यकुमार भारतासाठी टी२०मध्ये सर्वाधिक सामनावीर पुरस्कार जिंकणारा खेळाडू ठरला आहे. त्याने विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना मागे टाकले आहे.
Suryakumar Yadav
Sakal
विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत १६ वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे.
Virat Kohli
Sakal
रोहित शर्माने १४ वेळा आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत सामनावीर पुरस्कार जिंकला आहे.
Rohit Sharma
Sakal
Vaibhav Suryavanshi
Sakal