सूर्यकुमार यादव 'हिटमॅन'! रोहित शर्माला दिला धक्का, नोंदवला वर्ल्ड रेकॉर्ड

Pranali Kodre

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात टी२० मालिकेतील पहिला सामना कॅनबेरा येथे २९ ऑक्टोबर रोजी झाला.

Suryakumar Yadav - Shubman Gill

|

Sakal

सूर्यकुमारचे २ षटकार

या सामन्यादरम्यान भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने २ षटकार मारताच मोठा विक्रम केला.

Suryakumar Yadav

|

Sakal

१५० षटकार

सूर्यकुमारने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १५० षटकार पूर्ण केले आहेत. त्याने ८६ डावात १५० षटकार मारले आहेत.

Suryakumar Yadav

|

Sakal

पाचवा फलंदाज

सूर्यकुमार आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये १५० षटकार पूर्ण करणारा जगातील पाचवा फलंदाज आहे.

Suryakumar Yadav

|

Sakal

सर्वात कमी डावात १५० षटकार

तसेच सूर्यकुमार आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वात कमी डावात १५० षटकार पूर्ण करणारा एकूण दुसऱ्या क्रमांकाचा, तर कसोटीचा दर्जा असलेल्या संघांमध्ये अव्वल क्रमांकाचा खेळाडू आहे.

Suryakumar Yadav

|

Sakal

पहिला क्रमांक

सूर्यकुमारपेक्षा कमी डावात संयुक्त अरब अमिराती (UAE) संघाच्या मोहम्मद वासिमने १५० टी२० षटकार मारले होते. त्याने ६६ डावात १५० षटकार पूर्ण केले होते. पण युएई कसोटी क्रिकेट खेळत नाही.

Muhammad Waseem

|

Sakal

वासिम अन् सूर्यकुमारनंतर...

मोहम्मद वासिम आणि सूर्यकुमारनंतर मार्टिन गप्टीलने १०५ डावात, तर जॉस बटलर आणि रोहित शर्मा यांनी प्रत्येकी ११९ डावात १५० टी२० षटकार पूर्ण केले होते.

Martin Guptill

|

Sakal

रोहित शर्मा

आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये रोहित शर्मा २०५ षटकारांसह अव्वल क्रमांकावर आहे.

Rohit Sharma

|

Sakal

सर्वाधिक T20I षटकार

रोहितपाठोपाठ आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंमध्ये मुहम्मद वासिम (१८७), मार्टिन गप्टील (१७३), जॉस बटलर (१७२) आणि सूर्यकुमार यादव(१५०) आहेत.

Suryakumar Yadav

|

Sakal

धोनीच्या लेकीला मोठं होऊन काय बनायचंय? १० वर्षीय झिवाने स्वत: च सांगितलं

Ziva Dhoni dream profession

|

Instagram

येथे क्लिक करा