Pranali Kodre
भारतात सध्या इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धा सुरू आहे.
या स्पर्धेत मुंबई इंडियन्सची सुरुवात सलग दोन पराभवांनी झाली. पण नंतर तिसऱ्या सामन्यात त्यांनी कोलकाता नाईट रायडर्सला पराभूत केले.
यानंतर आता मुंबई इंडियन्सला चौथा सामना ४ एप्रिलला लखनौमध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्ध खेळायचा आहे. त्यामुळे संघ सध्या लखनौमध्ये आहे.
तसेच येत्या ६ एप्रिलला रामनवमी देखील आहे. अशातच मुंबई इंडियन्सचे काही खेळाडू श्री रामाच्या दर्शनासाठी अयोध्येला पोचले आहेत.
सूर्यकुमार यादव, कर्ण शर्मा, दीपक चाहर, तिलक वर्मा या मुंबई इंडियन्सच्या खेळाडूंनी अयोध्येमध्ये हजेरी लावली होती.
सूर्यकुमार यादव आणि दीपक चाहर यांच्या पत्नीही त्यांच्यासह अयोध्येला दर्शनासाठी आल्या होत्या. त्यांनी मंदिरात पूजाही केली.
खेळाडूंच्या अयोध्या दर्शनाचे फोटो सोशल मीडियावर त्यांनी शेअर केले आहेत.