Anuradha Vipat
सुझान अर्सलन गोणीला डेट करत आहे
सुझान खानने बॉयफ्रेंड अर्सलनच्या वाढदिवशी सोशल मीडियावर एक खास पोस्ट शेअर केली होती.
त्या पोस्टवर हृतिक रोशनने देखील कमेंट केली आहे
सुझानने तिच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर अर्सलनसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये दोघे एकमेकांना मिठी मारताना दिसत आहेत.
हे फोटो शेअर करत सुझानने लिहिलं आहे की, "मला जर आयुष्यात काही हवं असेल तर तो तू आहेस. हॅप्पी बर्थ डे माय डार्लिंग. तू मला जगातील सर्वात आनंदी स्त्री बनवले आहेस.
पुढे सुझानने लिहिलं आहे की, मी दररोज प्रार्थना करते आणि आशा करते की यापुढील काळ हा आपला सर्वोत्तम काळ असेल. आपल्या आयुष्यातील सर्वोत्तम दिवस सुरू होतील आणि ते कायमचे असतील. माझे तुझ्यावर प्रचंड प्रेम आहे