सकाळ डिजिटल टीम
स्वामी विवेकानंदांनी आपल्या विचारांद्वारे जगभर भारतीय अध्यात्माचा प्रसार केला. त्यांच्या ग्रंथांमधून जीवन, अध्यात्म आणि व्यक्तिमत्त्व विकासाचे मार्गदर्शन मिळते.
Swami Vivekananda's Timeless Literary Legacy
sakal
कर्म करताना निःस्वार्थ भाव ठेवणे आणि कर्तव्यालाच ईश्वरसेवा मानणे, हा 'कर्मयोग' या पुस्तकाचा मुख्य संदेश आहे.
Karma Yoga
sakal
'राजयोग' या ग्रंथात मनावर नियंत्रण, ध्यान आणि योगाच्या माध्यमातून आत्मसाक्षात्काराचा मार्ग समजावून सांगितला आहे.
Raja Yoga
sakal
'ज्ञानयोग' मध्ये आत्मज्ञान, सत्याचा शोध आणि मुक्तीचा मार्ग यावर विवेकानंदांनी सखोल विचार मांडले आहेत.
Jnana Yoga
sakal
ईश्वरावरील निस्वार्थ प्रेम, श्रद्धा आणि भक्ती यांचे महत्त्व 'भक्तियोग' या पुस्तकातून स्पष्ट केले आहे. खऱ्या भक्तीमुळे मन शुद्ध होते,अंतर्मनाला शांती मिळते, असे या ग्रंथात सांगितले आहे.
Bhakti Yoga
sakal
भारतात परतल्यानंतर दिलेल्या प्रेरणादायी व्याख्यानांचा हा संग्रह असून राष्ट्रप्रेम, संस्कृती आणि आत्मविश्वासाचा संदेश यातून मिळतो.
Lectures from Colombo to Almora
sakal
हार्वर्ड विद्यापीठातील प्रसिद्ध व्याख्यानावर आधारित हा ग्रंथ वेदांताचे सोप्या भाषेत स्पष्टीकरण करतो. या व्याख्यानानंतर विवेकानंदांना हार्वर्डकडून प्राध्यापकपदाची ऑफरही मिळाली होती.
Vedanta Philosophy
sakal
शिष्यांना दिलेल्या मार्गदर्शनपर विचारांचा हा संग्रह आहे. आजही आत्मविकास, अध्यात्म आणि सकारात्मक जीवनासाठी हा ग्रंथ प्रेरणादायी मानला जातो. स्वामी विवेकानंदांचे विचार आजच्या पिढीलाही ध्येय, आत्मविश्वास आणि सकारात्मकतेची प्रेरणा देतात.
Inspired Talks
sakal
International Plastic-Free Day
sakal