Pranali Kodre
स्वामी विवेकानंद यांना भारतीय इतिहासातील विचारवंत आणि अध्यात्मिक गुरु म्हणून ओळखले जाते.
बंगालमधील कोलकाता येथे १२ जानेवारी १८६३ मध्ये विवेकानंदांचा जन्म झाला.त्यांचं पूर्ण नाव नरेंद्रनाथ दत्त असे होते.
अध्यात्मिक गुरु म्हणून ओळखले जात असले तरी स्वामी विवेकानंद खेळाचेही चाहते होते. तरुण असताना ते देखील विविध खेळ खेळले.
विशेष म्हणजे त्यांनी क्रिकेटमध्ये एक दमदार पराक्रमही ब्रिटिशांविरुद्ध केला होता.
१८८० च्या दशकात बंगाली तरुणांनी स्थापन केलेल्या टाऊन क्लबने ब्रिटिशांच्या कलकत्ता क्रिकेट क्लब (CCC) ला आव्हान दिले.
त्यावेळी टाऊन क्लब आणि कलकत्ता क्रिकेट क्लब यांच्यात इडन गार्डन्सवर सामना झाला होता. या सामन्यात टाऊन क्लबकडून स्वामी विवेकानंद देखील खेळले होते.
महत्त्वाचे म्हणजे स्वामी विवेकानंद यांनी त्यांच्या गोलंदाजीने ब्रिटिशांना दबावात टाकताना ७ विकेट्सही घेतल्या होत्या.
स्वामी विवेकानंद हे टाऊन क्लबकडून केवळ क्रिकेटच नाही, तर फुटबॉल देखील खेळायचे.
टाऊन क्लबने त्यांच्या सुवर्णमहोत्सवाच्या निमित्ताने एक बुकलेट प्रदर्शित केले होते. यामध्ये स्वामी विवेकानंद त्यांच्यासाठी क्रिकेट आणि फुटबॉल खेळल्याचा उल्लेख आहे.
टाऊन क्लब हा कोलकातामधील जुना क्लब असून या क्रिकेट संघानंतर मोहम्मद शमीही खेळला आहे.