Anuradha Vipat
मराठी रसिक प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे
काल लक्ष्मीकांत बेर्डे यांचा स्मृतीदिन होता. त्यानिमित्ताने लेक स्वानंदी बेर्डेने सोशल मीडियावर भावुक पोस्ट लिहिली होती .
लक्ष्मीकांत बेर्डेचा एक जुना सुंदर फोटो शेअर करत स्वानंदीने लिहिलं आहे, “बाबा तुम्हाला जाऊन २० वर्ष उलटून गेली, पण तुमच्या आठवणी अजूनही ज्वलंत वाटतात.
पुढे स्वानंदीने लिहिलं आहे, तुमचा दयाळूपणा, विनोदीबुद्धी आणि अतूट प्रेमाने एका व्यक्तीला आणि मला आकार दिला.
पुढे स्वानंदीने लिहिलं आहे, इतक्या वर्षानंतरही तुमचे चाहते तुमच्या कामाची, विनोदाची प्रशंसा करत आहेत. तुम्ही सगळ्यांवर जबरदस्त छाप सोडली आहे
पुढे स्वानंदीने लिहिलं आहे, मी दिवसेंदिवस तुमच्यावर अधिक प्रेम करत आहे. तुमची मला खूप आठवण येत आहे. तुमची अनुपस्थिती ही आम्हाला नेहमी गमावलेल्या मौल्यवान वेळेची सतत आठवण करू देत असते.
पुढे स्वानंदीने लिहिलं आहे, तुमचा आत्मा मला आयुष्यातल्या आव्हानांमध्ये मार्गदर्शन करतो. बाबा, आपण पुन्हा भेटत राहू