Anuradha Vipat
नुकताच स्वामी समर्थ यांचा प्रकट दिन पार पडला. अभिनेता - निर्माता स्वप्नील जोशी हा स्वामी भक्त आहे हे सगळ्यांना माहीत आहे.
त्याने त्याच्या सोशल मीडियावर स्वामी समर्थ यांचा एक मन प्रसन्न करणारा व्हिडिओ पोस्ट केला आहे यातून स्वप्नील स्वामींचा निस्सीम भक्त आहे हे दिसून येत.
स्वप्नीलच्या सोबतीने त्याच्या घरी सगळेच स्वामींचे भक्त आहे आणि त्याची ही भक्ती या व्हिडिओ मधून दिसून येते आहे.
सध्या स्वप्नील त्याचा निर्मिती असलेला " नाच गं घुमा " या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे.
स्वप्नीलची भक्ती ही सगळ्यांनी पाहिली आहे. काम आणि घर दोन्ही गोष्टीची योग्य सांगड घालून स्वप्नील सगळचं उत्तमपणे निभावून घेतो आहे
2024 वर्ष हे त्याच्या साठी खूप जास्त खास आहे कारण तो अभिनयाच्या सोबतीने निर्माता सुद्धा झाला आहे आणि आगामी काळात तो अनेक मनोरंजक प्रोजेक्ट्समध्ये दिसणार आहे.