Anuradha Vipat
मराठी सिनेसृष्टीतील आघाडीच्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे स्वप्नील जोशी.
स्वप्नीलने आजवर अनेक रोमँटिक चित्रपटात काम केलं आहे.
स्वप्नीलला मराठी सिनेसृष्टीतील चॉकलेट हिरो म्हणून ओळखलं जात.
आता लवकरच स्वप्नील जोशी कधीही न पाहिलेल्या भूमिकेतून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
अभिनेता स्वप्नील जोशी आगामी ‘जिलबी’ चित्रपटात झळकणार आहे.
याच चित्रपटात स्वप्नील विजय करमरकर या डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे.
या चित्रपटाचं दमदार मोशन पोस्टर नुकतंच प्रदर्शित झालं