Apurva Kulkarni
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानने भारतीय लष्कराच्या आस्थापनांना लक्ष्य केलं. दरम्यान भारताने सुद्धा चोख प्रतिउत्तर दिलय.
या युद्धजन्य परिस्थितीत अभिनेत्री स्वरा भास्कर तिच्या पोस्टमुळे चांगलीच ट्रोल झाली आहे.
स्वरा भास्करने तिच्या इन्टाग्राम अकाऊंटवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमुळे तिला ट्रोल केलं जातय.
तिने सोशल मीडियावर अनेक पोस्ट केल्यात. त्यात एका पोस्टमध्ये तिने युद्धाला 'प्रोपोगंडा' असा म्हटलय.
स्वराने जॉर्ड ऑरवेल यांची ओळ शेअर करत म्हटलय की, 'प्रत्येक युद्ध हा प्रोपोगंडा आहे. आवाज, द्वेष हा त्या लोकांमधून दिसून येतोय.'
तर दुसरी पोस्ट करत तिने म्हटलय , 'ज्यांना युद्ध हवय त्यांनी लढणाऱ्या कुटुंबातील सदस्याकडे बघा.. खरंच तुम्ही कोणाला गमवण्यासाठी तयार आहात...'
तिने तिसरी पोस्ट तिरंगा फडकावल्याची बातमी शेअर करत केली आहे. 'या मुर्खपणाचा शेवट कधी होणार... एकाच वेळीचा हा नीच आणि मुर्खपणाची आहे..?'
दरम्यान तिने टाकलेल्या स्टोरीमुळे तिला चांगलंच ट्रोल करण्यात आलं आहे.
तिची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी तिच्यावर टीका करताय.