Shubham Banubakode
इ.स. १६८१ मध्ये औरंगजेबाने कोकण जिंकण्यासाठी स्वराज्यावर घाला घातला. कोकणात मुघल सरदार पाठवले.
संभाजी महाराजांनी पहिल्या अडीच वर्षांत मुघलांशी नेटाने सामना केला आणि त्यांना रोखले.
कोकणातील या अटीतटीच्या लढतीत मराठे मुघलांवर भारी पडले. मुघल मोहीम फसली.
मुघल पराभूत होत असल्याचे पाहून औरंगजेब चिडला आणि अधिक त्वेषाने मोहिमेस लागला.
औरंगजेबाने पागोटे (पगडी) डोक्यावरून काढून जमिनीवर आपटले आणि घोषणा केली की "संभाजीचा पाडाव होईपर्यंत हे पुन्हा घालणार नाही!"
औरंगजेबाने उत्तर कोकणातील मुघल सैन्याला चेतावणी दिली – पराभव चालणार नाही.
मराठ्यांनी पर्वत, जंगल, आणि गावांमधून छापामार लढाई करून मुघल सैन्याची दाणादाण उडवली.
संभाजी महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी कोकणातील मुघल मोहिमेचा मुळासकट नायनाट केला.
औरंगजेबाने पगडी न घालण्याची प्रतिज्ञा केली तो सीन छावा सिनेमातही दाखवला आहे.