सकाळ डिजिटल टीम
उकाडा, हलकी स्किन केअर आणि चुकीच्या प्रॉडक्ट्समुळे तुमचा मेकअप वितळतो आणि खराब होतो.
चेहरा बर्फाने थंड करा.मेकअप करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुऊन त्यावर बर्फ लावा. यामुळे रोमछिद्रे आकुंचित होतात आणि घाम कमी येतो.
तुमच्या त्वचेला योग्य ते जेल किंवा मॉइश्चरायझर लावा. त्वचेला पुरेसे हायड्रेशन मिळणे खूप महत्त्वाचे आहे.
प्रायमर त्वचेला एक गुळगुळीत बेस देतो आणि यामुळे तुमचा मेकअप जास्त काळ टिकतो.
नेहमी 'स्वेट-प्रूफ' (Sweat-proof) आणि 'नॉन-कॉमेडोजेनिक' (Non-comedogenic) प्रॉडक्ट्सचा वापर करा.
हे प्रॉडक्ट्स तुमची त्वचा ब्लॉक करत नाहीत, त्यामुळे पिंपल्स येत नाहीत आणि मेकअप पॅची दिसत नाही.
लाइटवेट प्रॉडक्ट्स त्वचेवर सहज पसरतात आणि नैसर्गिक लुक देतात.
तुमच्या त्वचेच्या रंगाशी जुळणारा फाउंडेशनच निवडा. यामुळे मेकअप पॅची दिसणार नाही आणि तो त्वचेत एकरूप दिसेल.