Aarti Badade
कामाच्या व्यापामुळे लोक आरोग्याकडे दुर्लक्ष करतात, त्यामुळे मधुमेहासारखे गंभीर आजार वाढले आहेत.
मधुमेह रुग्णांना सहसा गोड पदार्थ आणि गोड फळांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जातो.
काही नैसर्गिक गोड फळे अशी आहेत जी मधुमेहाच्या रुग्णांनी न घाबरता खाऊ शकतात.
पपई कमी कॅलरीचे, अँटीऑक्सिडंट्स आणि फायबरयुक्त फळ आहे. हे वजन नियंत्रित ठेवते व पेशींचे नुकसान होऊ देत नाही.
ब्लूबेरी, स्ट्रॉबेरी, चेरी यांसारख्या बेरी सुपरफूड मानल्या जातात. या रक्तातील साखर नियंत्रणात ठेवतात.
पेरूमधील फायबर पोट बराच वेळ भरलेले ठेवते. हे वजन नियंत्रणात ठेवते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
जांभुळातील जांबोलिन व जांबुसिन संयुगे इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारतात आणि मधुमेह नियंत्रणात मदत करतात.
ही फळे खाल्ल्याने गोड खाण्याची इच्छा पूर्ण होते आणि रक्तातील साखरही संतुलित राहते.