Aarti Badade
गर्भवती महिलांसाठी मोसंबीचा रस खूप फायदेशीर आहे. तो कसा आणि का महत्त्वाचा आहे, हे या वेबस्टोरीत जाणून घेऊया.
मोसंबीचा रस प्यायल्याने बाळाला विशेष पोषक घटक मिळतात. हे घटक बाळाच्या चांगल्या विकासासाठी खूप महत्त्वाचे असतात.
मोसंबीमध्ये व्हिटॅमिन सी, पोटॅशियम आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात. हे सर्व नैसर्गिक घटक आरोग्यासाठी उत्तम आहेत.
मोसंबीचा रस शरीराला ताजेतवाने ठेवतो. तो रोगप्रतिकारशक्ती (इम्युनिटी) वाढवतो, जे गर्भवती महिलांसाठी अत्यंत महत्त्वाचे आहे.
गरोदरपणात अनेकदा ॲसिडिटी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. मोसंबीच्या रसाने हे त्रास कमी होतात आणि पचन सुधारते.
मोसंबीमधील पोषक तत्वामुळे रक्त शुद्ध होते. तसेच, थकवा दूर होतो आणि हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.
उष्ण हवामानात मोसंबीचा रस शरीराला थंडावा देतो. गर्भवती महिलांसाठी हे खूप उपयुक्त आहे, कारण त्यांना उष्णतेचा त्रास होऊ शकतो.
मोसंबीचा रस दुधासोबत किंवा नाश्त्यामध्ये नियमित प्यायल्यास पोषणात संतुलन राहते. यामुळे सकस आहार घेण्यास मदत होते.
तुम्ही सकाळी किंवा दुपारी एकदा, अर्धा ते एक ग्लास मोसंबीचा रस पिऊ शकता. मात्र, तो पिण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.