काकडी कडू निघतेय? खरेदी करताना वापरा 'या' सोप्या ट्रिक्स!

Aarti Badade

उन्हाळ्यातील 'सुपरफूड'

उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी आणि हायड्रेटेड राहण्यासाठी काकडी खाणे अत्यंत फायदेशीर असते.

identify good cucumber

|

sakal

काकडीचा आकार तपासा

खरेदी करताना मध्यम आकाराची काकडी निवडा; खूप जास्त मोठ्या किंवा जाड काकडीमध्ये बिया जास्त आणि ती कडू असण्याची शक्यता असते.

identify good cucumber

|

Sakal

रंगावरून करा पारख

काकडीचा रंग गडद हिरवा असावा; जर काकडी फिकट पिवळसर दिसत असेल, तर ती जुनी किंवा कडू असू शकते.

identify good cucumber

|

Sakal

टोकाच्या भागाचे निरीक्षण करा

काकडीच्या दोन्ही टोकांकडे लक्ष द्या; जर टोकाचा भाग खूप वाळलेला किंवा मऊ वाटत असेल, तर ती काकडी कडवट असू शकते.

identify good cucumber

|

sakal

कडकपणा तपासा

काकडी हाताने दाबून पहा; ताजी आणि गोड काकडी कडक असते, तर कडू लागणारी काकडी अनेकदा मध्यभागी मऊ असते.

identify good cucumber

|

Sakal

सालीचा पोत पहा

ज्या काकडीची साल जास्त खडबडीत किंवा काटेरी असते, ती गावरान आणि चवीला गोड असते; अगदी गुळगुळीत काकडी कधीकधी बेचव असते.

identify good cucumber

|

sakal

कापल्यानंतर कडू वाटल्यास...

काकडी खाण्यापूर्वी दोन्ही टोके कापून त्या भागावर थोडे मीठ चोळा, यामुळे त्यातील 'कुकरबिटासीन' हा कडवट घटक बाहेर पडतो.

identify good cucumber

|

sakal

ताजी काकडी, उत्तम आरोग्य!

बाजारात चमकणारी आणि ओलावा असलेली काकडी निवडा, ज्यामुळे तुमच्या कोशिंबिरीची चव नेहमीच फ्रेश राहील.

identify good cucumber

|

Sakal

लिव्हर खराब होण्यापूर्वी पाय देतात 'हे' 4 संकेत!

Liver problem symptoms in feet

|

sakal

येथे क्लिक करा