उपवास स्पेशल! गोड-तिखट चवीची कुरकुरीत रताळ्याची कचोरी

Aarti Badade

उपवासाची चटपटीत मेजवानी

रताळ्यापासून बनवलेली ही कचोरी चवीला गोड-तिखट आणि अत्यंत कुरकुरीत लागते.

Ratale Kachori recipe

|

Sakal

कचोरीसाठी लागणारे घटक

या रेसिपीसाठी चार मोठी रताळी, ओले खोबरे, काजू, बेदाणे, साखर, लिंबू आणि कोथिंबीर लागेल.

Ratale Kachori recipe

|

Sakal

रताळे शिजवण्याची पद्धत

प्रथम रताळी उकडून आणि सोलून घ्या व त्यात चवीपुरते मीठ घालून हाताने व्यवस्थित कुस्करून मळून घ्या.

Ratale Kachori recipe

|

sakal

मिश्रण चिकट झाल्यास काय करावे?

रताळी चिकट असल्यास मिश्रणात साबुदाणा किंवा वरीचे भाजलेले पीठ घातल्याने गोळा व्यवस्थित तयार होतो.

Ratale Kachori recipe

|

sakal

शाही सारणाची तयारी

ओले खोबरे, काजू, बेदाणे, साखर, मीठ, आले, लिंबू आणि कोथिंबीर एकत्र करून चवदार सारण बनवून घ्या.

Ratale Kachori recipe

|

Sakal

कचोरी कशी भरावी?

रताळ्याच्या पिठाची पारी तयार करून त्यात तयार केलेले सारण भरा आणि कचोरीचा आकार द्या.

Ratale Kachori recipe

|

Sakal

फ्रिजमध्ये सेट करणे महत्त्वाचे

कचोऱ्या तयार झाल्यावर त्या किमान चार तास फ्रिजमध्ये ठेवाव्यात जेणेकरून त्या तळताना फुटणार नाहीत.

Ratale Kachori recipe

|

Sakal

खरपूस तळून घ्या

कचोऱ्या खाण्याच्या वेळी गरम तेलात मध्यम आचेवर छान सोनेरी रंग येईपर्यंत तळून घ्या.

Ratale Kachori recipe

|

sakal

कोथिंबिरीची विशेष चटणी

बारीक चिरलेली कोथिंबीर, दाण्याचे कूट, साखर, मीठ आणि जिरे एकत्र करून झटपट चटणी तयार करा.

Ratale Kachori recipe

|

sakal

गरमागरम आस्वाद घ्या

तयार झालेली ही रताळे कचोरी दह्यासोबत किंवा कोथिंबीर चटणीसोबत उपवासाला आवडीने सर्व्ह करा.

Ratale Kachori recipe

|

sakal

मुलांची प्रतिकारशक्ती वाढवणारी पंचरत्न मिक्स डाळ; नोट करा 'ही' पौष्टिक रेसिपी

Panchratna Mixed Veg Dal recipe

|

Sakal

येथे क्लिक करा