Saisimran Ghashi
हाडे कमकुवत (Weak Bones) होणे हे वयोमानानुसार किंवा चुकीच्या आहारविहारामुळे सामान्य बाब आहे.
पण याकडे वेळेवर लक्ष न दिल्यास संधिवात (Arthritis) किंवा ऑस्टियोपोरोसिस (Osteoporosis) सारखे गंभीर आजार उद्भवू शकतात.
हाडे कमकुवत होत असल्याची ३ प्रमुख लक्षणे आहेत, ज्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये
सतत पाठ, कंबर, गुडघे किंवा इतर सांध्यांमध्ये दुखणे सुरू असल्यास हे हाडे कमजोर होण्याचे लक्षण असू शकते.
शरीराला थोड्याशा धक्क्यात हाडांना मार लागणे किंवा फ्रॅक्चर होणे
अचानक उंची कमी वाटणे किंवा पाठीचा कणा वाकलेला जाणवणे हे हाडांचे कमजोरपणा आणि हाडातील कॅल्शियमची कमतरता याचे लक्षण असते.
या लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास हाडांची झीज अधिक वाढते आणि संधिवात, ऑस्टियोपोरोसिस, फ्रॅक्चर यासारखे आजार जडू शकतात.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.