संतोष कानडे
ताडोबा व्याघ्र प्रकल्पाची अनभिषित्क सम्राज्ञी माया वाघीण नेमकी कुठे गेली? तिचं काय झालं? हे प्रश्न अनुत्तरितच आहेत.
ऑगस्ट २०२३ मध्ये मायाचं शेवटचं दर्शन झालेलं होतं. तिला ताडोबातल्या पंचधारा परिसरात पाहिलं होतं.
मायाने पर्यटकांच्या मनात खास स्थान निर्माण केलं होतं. तिच्यामुळेच व्याघ्र पर्यटन नावारुपाला आलं, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.
महाराष्ट्रात नव्हे तर देशात तिच्या चाहत्यांची मोठी संख्या आहे. पर्यटकांच्या गाड्यांसमोर ती बिनधास्त यायची आणि पोझ द्यायची.
तिचे अनेक फोटो, व्हिडीओ व्हायरल झालेले आहेत. शिवाय तिचं आयुष्यसुद्धा इतर वाघांपेक्षा फारच निराळं होतं, असं तज्ज्ञ सांगतात.
मायाने तिच्या हद्दीमध्ये आलेल्या चार लोकांचा जीवदेखील घेतलेला होता. मात्र इतरवेळी ती फारच मनुष्यप्रेमी होती.
तिच्या पिलांसोबत खेळताना अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियात आहेत. केवळ तिला बघणयासाठी अनेक दिग्गज लोक ताडोबात यायचे.
माया नेमकी कुठे गेली, तिचा कुणी घातपात केला का, ती इतर कुठल्या जंगलात गेली का, याची उत्तरं वन विभागाकडे नाहीत.
पर्यटन आणि रोजगाराला चालना देणारी एक वाघीण अशी गायब झाल्याने अनेक शोधमोहिमा राबवल्या, पण माया सापडली नाही.