Varsha Balhe
सकाळी उठल्यावर अनेकजण नाश्त्याला पोहे, उपमा, इडली किंवा डोसा खातात. काही जण बाहेर जाऊन नाश्ता करतात. साधारणपणे बाहेर नाश्ता करण्यासाठी ३० ते १०० रुपये खर्च येतो.
TAJ HOTEL BREAKFAST PRICE
esakal
नाश्त्यामध्ये पोहे, उपमा, इडली, डोसा, सँडविच, ऑम्लेट असे अनेक पदार्थ मिळतात. प्रत्येकाला आपल्या आवडीनुसार नाश्ता करायला आवडतो.
TAJ HOTEL BREAKFAST PRICE
esakal
सामान्य हॉटेलमध्ये नाश्ता केल्यास फारसा खर्च येत नाही. मात्र, मोठ्या आणि महागड्या हॉटेलमध्ये याच पदार्थांच्या किमती खूप जास्त असू शकतात.
TAJ HOTEL BREAKFAST PRICE
esakal
मुंबईतील प्रसिद्ध ताज महाल पॅलेस हॉटेलमध्येही सकाळच्या नाश्त्यासाठी वेगवेगळे पदार्थ मिळतात. मात्र, इथल्या नाश्त्याची किंमत ऐकून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.
TAJ HOTEL BREAKFAST PRICE
esakal
ताज हॉटेलच्या शामियाना रेस्टॉरंटमधील मेनूनुसार, ऑम्लेटची किंमत साधारण १,१०० रुपये, पोह्यांची किंमत १,४०० रुपये, तर पॅनकेक्सची किंमत १,२५० रुपये आहे. फ्रेंच टोस्टसाठी साधारण १,६०० रुपये मोजावे लागतात.
TAJ HOTEL BREAKFAST PRICE
esakal
ताज हॉटेलमध्ये दोघांनी नाश्ता केल्यास पदार्थांच्या निवडीनुसार साधारण ३,००० ते ५,००० रुपये किंवा त्यापेक्षा जास्त खर्च येऊ शकतो. यामध्ये सरकारी कर आणि इतर शुल्क वेगळे असू शकतात.
TAJ HOTEL BREAKFAST PRICE
esakal
रस्त्यावर किंवा सामान्य हॉटेलमध्ये १०० रुपयांच्या आत होणारा नाश्ता ताज हॉटेलमध्ये करण्यासाठी हजारो रुपये खर्च करावे लागू शकतात. त्यामुळे ताज हॉटेलमधील नाश्त्याचे दर पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल!
TAJ HOTEL BREAKFAST PRICE
esakal
Taj Hotel Mumbai Tea Price
esakal