ताज हॉटेलमध्ये एक कप चहाची किंमत किती?

Varsha Balhe

चहा

चहा म्हटलं की अनेकांच्या दिवसाची सुरुवात होते. सकाळी असो किंवा संध्याकाळी, चहा पिण्याची अनेकांना सवय असते.

Taj Hotel Mumbai Tea Price

|

esakal

चहाचे प्रकार

चहामध्येही अनेक प्रकार आहेत. साधा चहा, मसाला चहा, आल्याचा चहा, ग्रीन टी असे वेगवेगळे प्रकार लोक आवडीने पितात.

Taj Hotel Mumbai Tea Price

|

esakal

सर्वांचा आवडता चहा

रस्त्याच्या कडेला मिळणारा चहा असो किंवा घरात बनवलेला चहा, अनेकांना चहा प्यायला आवडतो. खर तर एका कप चहासाठी १० ते २० रुपये मोजावे लागतात.

Taj Hotel Mumbai Tea Price

|

esakal

फाईव्ह स्टार हॉटेलमधील चहा

सामान्य हॉटेलमध्ये मिळणाऱ्या चहापेक्षा फाईव्ह स्टार हॉटेलमधील चहाची किंमत जास्त असते. त्यामुळे मुंबईतील प्रसिद्ध ताज हॉटेलमध्ये एका कप चहाची किंमत किती असेल, असा प्रश्न अनेकांना पडतो.

Taj Hotel Mumbai Tea Price

|

esakal

ताज हॉटेलमधील चहाचे प्रकार

मुंबईतील ताज महाल पॅलेस हॉटेलच्या सी लाउंजमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चहा मिळतात. यामध्ये ताज हाऊस ब्लेंड, मुंबई मसाला चहा, रॉयल जाफरानी आणि रॉयल काहवा अशा प्रकारांचा समावेश आहे.

Taj Hotel Mumbai Tea Price

|

esakal

एका कप चहाची किंमत

ताज हॉटेलच्या सी लाउंजमधील मेनूनुसार, एका कप स्पेशालिटी चहाची किंमत साधारण ६५० ते ८५० रुपये आहे. यावर सरकारी कर वेगळे आकारले जातात. तर हॉटेलमधील इतर ठिकाणी नियमित चहाची किंमत साधारण ४५० ते ५०० रुपये आहे.

Taj Hotel Mumbai Tea Price

|

esakal

चहासोबत खाण्यासाठीही खास मेनू

ताज हॉटेलमध्ये चहासोबत खाण्यासाठीही वेगवेगळे पदार्थ मिळतात. सी लाउंजमध्ये आफ्टरनून टी बुफेची सुविधाही आहे. यासाठी स्टँडर्ड बुफेचे दर ३,२०० ते ३,७०० रुपये, महाराजा बुफेचे ४,५०० रुपये आणि शॅम्पेन बुफेचे ७,००० रुपये प्रति व्यक्ती आहेत. यावर कर वेगळे आहेत.

Taj Hotel Mumbai Tea Price

|

esakal

ताज हॉटेलमधील एक प्लेट पाणीपुरीची किंमत किती?

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Taj Hotel Pani Puri Price

|

esakal

येथे क्लिक करा