ताज हॉटेलमध्ये मिळणारा सर्वात स्वस्त पदार्थ कोणता?

Varsha Balhe

ताज हॉटेल

मुंबईतील ताज महाल पॅलेस हॉटेल हे देशातील प्रसिद्ध आणि आलिशान हॉटेलपैकी एक आहे. या हॉटेलमध्ये देश-विदेशातील अनेक पर्यटक येतात. इथल्या आलिशान सुविधा आणि पदार्थांच्या किमतीही नेहमी चर्चेत असतात.

TAJ HOTEL CHEAPEST FOOD PRICE

|

esakal

फाईव्ह स्टार हॉटेल

फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवण करायचं म्हटलं की अनेकांना मोठा खर्च येईल असं वाटतं. इथल्या पदार्थांच्या किमती सामान्य हॉटेलच्या तुलनेत जास्त असतात.

TAJ HOTEL CHEAPEST FOOD PRICE

|

esakal

ताज हॉटेलमधील पदार्थ

ताज हॉटेलमध्ये भारतीय आणि परदेशी पदार्थांचे अनेक पर्याय मिळतात. नाश्ता, जेवण, स्नॅक्स, केक आणि वेगवेगळ्या प्रकारची पेये येथे उपलब्ध आहेत.

TAJ HOTEL CHEAPEST FOOD PRICE

|

esakal

ला पॅटिसरी

ताज हॉटेलमध्ये ला पॅटिसरी नावाचं केक शॉप आहे. येथे केक, पेस्ट्री आणि चॉकलेट्स असे वेगवेगळे पदार्थ मिळतात.

TAJ HOTEL CHEAPEST FOOD PRICE

|

esakal

सर्वात स्वस्त पदार्थ कोणता?

नोव्हेंबर २०२६ मधील उपलब्ध दरांनुसार, ला पॅटिसरीमधील काही चॉकलेट्स आणि पेस्ट्री साधारण २५० ते ४०० रुपयांपासून मिळतात. त्यामुळे हॉटेलमध्ये काहीतरी खाण्यासाठी हा तुलनेने कमी खर्चाचा पर्याय आहे.

TAJ HOTEL CHEAPEST FOOD PRICE

|

esakal

चहा कॉफीची किंमत

ताज हॉटेलच्या शामियाना आणि सी लाउंज या रेस्टॉरंटमध्ये चहा किंवा कॉफी घेण्यासाठी साधारण ६५० ते ७५० रुपये खर्च येऊ शकतो. यावर कर वेगळा आकारला जातो.

TAJ HOTEL CHEAPEST FOOD PRICE

|

esakal

जेवणासाठी किती खर्च येतो?

शामियाना रेस्टॉरंटमध्ये भात, नान आणि रायता यांसारखे पदार्थही मिळतात. त्यांच्या किमती साधारण ३५० ते ४५० रुपयांपासून सुरू होतात. मात्र, पूर्ण जेवणासाठी यापेक्षा जास्त खर्च येऊ शकतो.

TAJ HOTEL CHEAPEST FOOD PRICE

|

esakal

सामान्य पदार्थ अन् ताज हॉटेलमधील पदार्थ!

सामान्य हॉटेलमध्ये सहज मिळणाऱ्या पदार्थांसाठी ताज हॉटेलमध्ये कित्येक पटीने जास्त पैसे मोजावे लागू शकतात. त्यामुळे मुंबईच्या या प्रसिद्ध हॉटेलमधील सर्वात स्वस्त पदार्थांची किंमतही अनेकांना आश्चर्यचकित करू शकते.

TAJ HOTEL CHEAPEST FOOD PRICE

|

esakal

ताज हॉटेलमध्ये वडापाव किती रुपयांना मिळतो?

TAJ HOTEL VADAPAV PRICE

|

esakal

येथे क्लिक करा