संतोष कानडे
जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहलाच्या जवळच चार शापित गल्ल्या आहेत. या भागात सर्रासपणे देहव्यापार चालतो.
इतिहासकारांच्या अभ्यासानुसार या गल्ल्या मुघल बादशहा जहांगीर आणि शाहजहान यांनी वसवल्या होत्या.
या गल्ल्या सैनिक आणि दरबारी लोकांसाठी होत्या. आज मात्र येथे बळजबरीने मुली आणल्या जात आहे. त्यांच्यासाठी हा नर्क बनलाय.
या गल्ल्यांना काश्मिरी बाजार म्हटलं जातं. जुन्या शहराच्या बाजाराप्रमाणे हा परिसर आहे. रस्त्यांच्या दोन्ही बाजूंनी दुकानांच्या रांगा आहेत.
इतिहासाचे अभ्यासक सुगम आनंद म्हणतात, हे बसई पूर्वी एक गाव होते. ते मुघलांच्या सैन्यासाठी आणि कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनासाठी स्थापन करण्यात आलं होतं.
पुढे ब्रिटिश सैनिकांच्या मनोरंजनाचं ठिकाण झालं.. आणि देहविक्रीचा व्यवसाय येथे वाढीस लागला. काही लोक या गल्ल्यांना ताजमहलाच्या निर्मितीशी जोडतात.
ताजमहल निर्माण केला जात होता तेव्हा मजुरांच्या आणि कर्मचाऱ्यांच्या मनोरंजनासाठी या गल्ल्या वसवल्या होत्या, असं ते सांगतात.
या ठिकाणी देशातल्या अनेक भागांतून बळजबरीने आणलेल्या तरुणींना जबरदस्तीने देहविक्रीच्या व्यवसायात लोटलं जातं.
येथे पोलिस धाड टाकतात आणि तरुणींची सुटका करतात. पण सातत्याने हे सुरुच आहे. महिलांची ही एक छळछावणी शेकडो वर्षांपासून सुरु आहे.
नॅशनल एड्स कंट्रोल सोसायटीसाठी काम केलेले शशी शर्मा सांगतात, येथे जीव गुदमरणाऱ्या वातावरणात सेक्स रॅकेट चालतं.
दहा फूट लांब आणि पाच फूट रुंद अशा रुम बनवण्यात आलेल्या आहेत. या रुमध्ये तरुणींना टाकलं जातं आणि त्यांच्याकडून देहव्यापार करुन घेतला जातो.