ताज हॉटेलमध्ये चहा, कॉफी कितीला मिळते?

संतोष कानडे

ताज

मुंबईतील ताजमहाल पॅलेस हॉटेलमध्ये मिळणाऱ्या चहा आणि कॉफीच्या किमती सामान्य कॅफे किंवा हॉटेलच्या तुलनेत निश्चितच जास्त आहेत.

चहा

उपलब्ध मेनूनुसार ताज हॉटेलमध्ये विविध प्रकारच्या चहासाठी साधारण ५०० रुपये मोजावे लागतात.

इंग्लिश ब्रेकफास्ट

यामध्ये इंग्लिश ब्रेकफास्ट टी, अर्ल ग्रे आणि ताज हाऊस ब्लेंड यांसारख्या लोकप्रिय चहांचा समावेश आहे.

मसाला चहा

मुंबई मसाला चहाचीही किंमत ५०० रुपये असून त्यासोबत ताजच्या आलिशान वातावरणाचा अनुभव मिळतो.

कॉफी

कॉफीच्या पर्यायांमध्ये एस्प्रेसोची किंमत ३९५ रुपये असून ती चहाच्या तुलनेत काहीशी स्वस्त आहे.

कॅपुचिनो

कॅपुचिनो आणि लॅटे या दोन्ही कॉफी प्रकारांसाठी प्रत्येकी ३९५ रुपये आकारले जातात.

सिंगल ओरिजिन कॉफी

सिंगल ओरिजिन कॉफीची किंमतही ३९५ रुपये असून कॉफीप्रेमींसाठी हा एक पर्याय उपलब्ध आहे.

थंड कॉफी

थंड कॉफी घ्यायची असल्यास तिच्यासाठी उपलब्ध मेनूनुसार ४२५ रुपये मोजावे लागतात.

३९५ ते ५०० रुपये

त्यामुळे ताज हॉटेलमध्ये चहा किंवा कॉफी घेण्यासाठी साधारण ३९५ ते ५०० रुपयांपर्यंत खर्च येऊ शकतो.

प्रत्यक्ष बिल

या सर्व किमतींवर लागू असलेले कर अतिरिक्त असल्याने प्रत्यक्ष बिलामध्ये यापेक्षा अधिक रक्कम आकारली जाऊ शकते.

मुघलांच्या वंशजांना रेल्वे स्टेशनबाहेर विकावा लागतोय चहा

<strong>येथे क्लिक करा</strong>