थंडीच्या दिवसात लहान मुलांच्या त्वचेची अशी घ्या काळजी!

सकाळ वृत्तसेवा

हिवाळा

हिवाळात त्वचेवर, ओठांवर व केसांवर विपरीत परिणाम होत असतात.

baby skin | Sakal

परिणाम

लहान मुलांची त्वचा प्रौढांच्या तुलनेत जास्त नाजूक असते. त्यामुळे लहान मुलांच्या त्वचेवर जास्त परिणाम दिसून येतो.

baby skin | Sakal

समस्या

थंडीमुळे लहान मुलांची त्वचा शुष्क होते, ओठ फाटतात आणि पुरळ येतात.

baby skin | Sakal

अंघोळ

मुलांना कोमट पाण्याने 10 मिनिटांत अंघोळ घालावी. साबणाचा पाण्यात जास्त वेळ खेळू देऊ नये. नवजात बाळ असेल तर कोमट टॉवेलने पुसणे घ्यावे.

baby skin | Sakal

त्वचेची देखभाल

अंघोळीनंतर त्वचा ओलसर असतानाच मॉइश्चरायझर लावावे. बदाम, खोबरेल किंवा ऑलिव्ह तेलाने हलक्या हाताने मसाज करावा.

baby skin | Sakal

आहार

मुलांना भरपूर पाणी पाजावे. आहारात हिरव्या भाज्या, मोड आलेली कडधान्ये, गाजर, बीट, मासे आणि प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश असावा.

baby skin | Sakal

कपडे

कॉटनचे कपडे आतून घालून लोकरचे कपडे बाहेरून घालावेत. स्वेटर थेट त्वचेवर घालणे टाळावे. कानटोपी, हातमोजे आणि पायमोजे घालावेत.

baby skin | Sakal

केस

अंघोळीपूर्वी तेलाने मसाज करणे फायदेशीर ठरते. स्वच्छ कंगव्याने केस विंचरावे.

baby skin | Sakal

सल्ला

विशेष त्वचा विकार असतील तर, तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला आवश्यक घ्यावा.

baby skin | Sakal

कडाक्याच्या थंडीत सुकामेवा खातोय भाव; जाणून घ्या फायदे!

dryfruit price | Sakal
येथे क्लिक करा.