Anushka Tapshalkar
लिंबाची साल ही व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्सचं उत्तम स्त्रोत आहे, जी त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे.
साखर, मध आणि लिंबाच्या सालींची पावडर एकत्र करून त्वचेवर लावून मऊ व चमकदार त्वचा मिळवा.
त्वचेचं निस्तेज कमी करण्यासाठी दही, हळद आणि ताज्या लिंबाच्या सालींचा पेस्ट तयार करून लावा.
लिंबाच्या साली पाण्यात उकळा आणि थंड झाल्यावर ते पाणी त्वचेवर टोनर म्हणून लावा.
लिंबाच्या सालींना खोबरेल तेलात २ आठवडे ठेवा आणि तयार तेल त्वचेसाठी वापरा.
लिंबाची पावडर आणि कोरफडीचा जेल एकत्र करून त्वचेवर लावल्याने पिंपल्स आणि डाग कमी होतात.
लिंबाची साल त्वचेचा रंग उजळते, रोमछिद्र स्वच्छ करते आणि कोलाजेन वाढवते.
ही केवळ सामान्य माहिती आहे. आरोग्यविषयक समस्या असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.