सकाळ डिजिटल टीम
लिंबाचा रस आणि मध मिसळून ओठांवर लावून रात्रभर ठेवा. यामुळे ओठांचा काळसरपणा हळूहळू कमी होतो. साखर आणि मधाने ओठ स्क्रबही करू शकता.
गुलाबाच्या पाकळ्या दुधात भिजवून त्याची पेस्ट तयार करा आणि ओठांवर लावा. यामुळे ओठांवर चमक येते आणि ते मऊ होतात.
नारळाच्या तेलात असलेल्या व्हिटॅमिन ईमुळे ओठ मऊ आणि काळसरपणापासून मुक्त होतात. नियमितपणे नारळ तेल लावल्याने ओठांची देखभाल होईल.
बदाम तेल आणि मध मिसळून ओठांवर लावल्यास ओठांचा रंग सुधारतो आणि ते मऊ राहतात.
कोरफडाच्या गाऱ्यात शीतल गुणधर्म असतात. हे ओठांची जळजळ आणि कोरडेपणा दूर करतो, तसेच ओठ मऊ आणि गुलाबी बनवतो.
ओठ चाटू नका, कारण यामुळे ओठांचा रंग गडद होऊ शकतो. ओठ हायड्रेटेड ठेवण्यासाठी भरपूर पाणी प्या आणि चांगल्या क्वालिटीचं लिप बाम वापरा.
धुम्रपानामुळे ओठ लवकर काळे होतात. त्यामुळे धुम्रपान टाळून ओठांचा नैसर्गिक रंग आणि सौंदर्य राखा.