Sandeep Shirguppe
तुम्हाला उष्णतेचा त्रास असेल आणि शरीरातील थंडावा कायम ठेवायचा असेल तर गुलकंद खाऊन बघा.
आयुर्वेदात गुलकंदला अनन्य साधारण महत्व आहे. गुलाबाच्या पाकळ्यांपासून गुलकंद तयार केला जातो.
गुलकंद तसाच अथवा दूधातून घेतल्यास अनेक फायदे मिळतात.
लघवीला जळजळ होणे, अॅसिडीटी, डोकेदुखी, मळमळ अशा समस्यावर मात करण्यासाठी गुलकंद उपयुक्त ठरेल.
तोंडात चट्टे, फोडं आल्यास गुलकंद खा, यामध्ये व्हिटॅमिन बीचे प्रमाण भरपूर असते.
बद्धकोष्ठतेचा त्रास असेल तर जेवल्यानंतर एक ते दोन चमचे गुलकंदाचं सेवन करावं.
आपल्या मुलांची स्मरणशक्ती चांगली राहण्यासाठी नियमित गुलकंद द्यावा.
गुलकंदामध्ये असणारे अँटीऑक्सिडंटस त्वचा एक्सफॉलिएट करण्यासाठी उपयुक्त ठरतात.