Anuradha Vipat
अभिषेक-ऐश्वर्याचं 2007 मध्ये लग्न झालं आहे
पण त्या दोघांमध्ये काही ठीक नाही अशी अफवा अनेक महिन्यांपासून पसरली होती
मात्र यावर ऐश्वर्या किंवा अभिषेक दोघांपैकी कोणीच आत्तापर्यंत प्रतिक्रिया दिलेली नाही.
मात्र आता सोशल मीडियावर ऐश्वर्या आणि अभिषेक बच्चनचे काही लेटेस्ट फोटो व्हायरल झाले असन त्यामध्ये हे जोडपं खूप खुश दिसत आहे
यामुळे त्यांच्या विभक्त होण्याच्या चर्चांवर आता काही काळासाठी ब्रेक लागला आहे.
फिल्म प्रोड्यूसर अनु रंजन यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पार्टीचे काही फोटो शेअर केले आहेत.
या फोटोमध्ये अभिनेता अभिषेक बच्चन हा त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चन आणि सासूबाई वृंदा राय यांच्यासह पोझ करताना दिसत आहे.