Anushka Tapshalkar
लल्लन टॉप ला दिलेल्या मुलाखतीत तमन्ना भाटियाने काही सौंदर्याचे गुपितं सांगितली. पण तिचं एक ‘हॅक’ ऐकून सर्वांनाच धक्का बसला!
"हे कदाचित तुमच्या प्रश्नामध्ये येतं की 'तू चेहऱ्यावर वापरलेली सर्वात विचित्र गोष्ट कोणती आहे' पण तथ्य हे आहे की तुमची थुंकी, जी सकाळी उठल्यावर तयार झालेली असते, ते थोडं भयंकर वाटतं, पण हे प्रत्यक्षात काम करतं." असं ती म्हणाली आणि आपलं म्हणणं ठामपणे मांडलं. तिने यापूर्वीही एका मुलाखतीत हेच हॅक सांगितलं होतं.
AIIMS येथील त्वचारोग तज्ज्ञ डॉ. गर्गी तनेजा यांनी सांगितलं की हा एक अपप्रचार आहे आणि त्यामुळे त्वचेला मोठं नुकसान होऊ शकतं.
तोंडात असलेल्या बॅक्टेरियामुळे थुंकी त्वचेवर लावल्यानं पिंपल्स वाढू शकतात आणि संसर्ग होण्याची शक्यता असते.
थुंकीतील एन्झाईम्समुळे त्वचेला खजा सुटणे, लालसरपणा, जळजळ आणि अधिक पिंपल्स येऊ शकतात.
थुंकी ऍसिडिक असल्याने त्वचेचं नैसर्गिक संतुलन बिघडतं आणि त्यामुळे पिंपल्स वाढू शकतात.
थुंकीत मुरुमांवर परिणाम करणाऱ्या आवश्यक घटकांचा अभाव असतो, त्यामुळे ती परिणामकारक नाही.
थुंकी लावल्याने त्वचेवर आणखी घाण आणि जंतू पोहोचू शकतात, ज्यामुळे त्वचेची स्थिती आणखी बिघडू शकते.
अशा घातक ट्रेंडपासून दूर राहा. त्वचारोग तज्ज्ञांनी सुचवलेले उपचारच वापरा – तेच सुरक्षित आणि प्रभावी आहेत.