संतोष कानडे
थलापती विजय यांना महागड्या आणि लक्झरी गाड्यांची प्रचंड आवड असून त्यांच्या ताफ्यात एकापेक्षा एक सरस जागतिक ब्रँड्सच्या गाड्या आहेत.
विजय यांच्या ताफ्यातील सर्वात मौल्यवान गाडी म्हणजे रोल्स रॉयस घोस्ट, जिची किंमत अंदाजे ६.९५ कोटी ते ७.९५ कोटी रुपयांच्या दरम्यान आहे.
तंत्रज्ञानाची आवड असलेल्या विजय यांनी अलीकडेच ही इलेक्ट्रिक लक्झरी कार खरेदी केली आहे, जिची किंमत सुमारे २ कोटी ते २.५० कोटी रुपये आहे.
आरामदायी प्रवासासाठी त्यांच्याकडे ऑडीची ही फ्लॅगशिप सेडान असून तिची किंमत साधारण १.६० कोटी ते १.९० कोटी रुपये आहे.
दिसायला स्टायलिश आणि दमदार कामगिरी करणाऱ्या रेंज रोव्हर इव्होक या एसयूव्हीची किंमत जवळपास ७० लाख ते ८० लाख रुपये आहे.
अनेकदा विजय यांना मर्सिडीजच्या एस-क्लासमध्ये पाहिले जाते, जिची किंमत १.७० कोटी रुपयांच्या पुढे आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, विजय यांच्या ताफ्यात लहान-मोठ्या मिळून ८ ते १० पेक्षा जास्त लक्झरी गाड्या आहेत, ज्यांची एकूण किंमत २० कोटींच्या वर जाते.
सुरक्षेला प्राधान्य देणाऱ्या विजय यांच्याकडे १ कोटी रुपयांची व्होल्वो XC90 ही सर्वात सुरक्षित मानली जाणारी गाडीदेखील आहे.