क्रिकेटर्सला फक्त 750 रुपये मॅच फी! बांगलादेश क्रिकेट प्रमुखांनी घेतला मोठा निर्णय

Pranali Kodre

तमिम इक्बाल

बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी नुकतीच माजी क्रिकेटपटू तमिम इक्बालची नियुक्ती झाली आहे. हे नियुक्ती होताच त्याने महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत.

Bangladesh Cricketers Get Salary Boost

|

Sakal

वेतनवाढीला मंजूरी

तो अध्यक्ष होताच बांग्लादेश क्रिकेट बोर्डाच्या ऍड-हॉक कमिटीने वेतनवाढीला मंजूरी दिली आहे.

Bangladesh Cricketers Get Salary Boost

|

Sakal

फक्त ७५० रुपये

बांगलादेशमध्ये महिला क्रिकेटपटूंना खूपच कमी मानधन मिळत होते. वनडे सामन्यासाठी महिला खेळाडूंना केवळ १००० टका म्हणजेत भारतीय रुपयांनुसार ७५० रुपये मिळत होते.

Bangladesh Cricketers Get Salary Boost

|

Sakal

तमिम आश्चर्यचकीत झाला अन्...

हा आकडा समताच तमिम आश्चर्यचकीत झाला आणि त्याने त्वरित महिला क्रिकेटपटूंची वनडेसाठी मॅच फी १५००० टका केली आहे.

Bangladesh Cricketers Get Salary Boost

|

Sakal

महिलांच्या प्रथम श्रेणी आणि टी२० साठीही वेतन वाढलं

तसेच प्रथम श्रेणी क्रिकेटसाठी महिला खेळाडूंना आता २० हजार टका, तर टी२० सामन्यासाठी १० हजार टका मॅच फी मिळणार आहे.

Bangladesh Cricketers Get Salary Boost

|

Sakal

मासिक मानधन

याशिवाय टॉप-३६ खेळाडूंचे मासिक मानधन ३० हजाराहून आता ४० हजार टका करण्यात आले आहे.

Bangladesh Cricketers Get Salary Boost

|

Sakal

पुरुष खेळाडूंचीही वेतनवाढ

याशिवाय पुरुष क्रिकेटपटूंचेही वेतन वाढवले आहे. A,B आणि C या श्रेणींसाठी अनुक्रमे ६५ हजार, ५० हजार आणि ४० हजार टका वेतन केले आहे. तसेच प्रथम श्रेणी सामन्यासाठी मॅट फी ७० हजाराहून १ लाख टका करण्यात आले आहे.

Bangladesh Cricketers Get Salary Boost

|

Sakal

सुरुवात चांगली...

तमिम इक्बालने असेही म्हटले की जरी ही वेतनवाढ आदर्श नसली, तरी सुरुवात चांगली आहे.

Tamim Iqbal

|

Sakal

IPL मध्ये तब्बल ३८६ ओव्हरमध्ये एकदाही नो-बॉल न टाकलेला गोलंदाज कोण?

Mumbai Indians

|

Sakal

येथे क्लिक करा