Aarti Badade
बिग बॉस १९ स्पर्धक तान्या मित्तलने उल्लेख केलेला 'दुबई वाला बकलावा' (Baklava) सध्या चर्चेत आहे. हा पारंपारिक तुर्की गोड पदार्थ घरी सहज बनवता येतो!
Tanya Mittal's Favourite Baklava Recipe
Sakal
बकलावा हा तुर्कीचा सर्वात जुना पारंपारिक गोड पदार्थ आहे. हा ग्रीस आणि लेबनॉनमध्येही लोकप्रिय आहे. २०१३ मध्ये, त्याला युनेस्कोच्या अमूर्त सांस्कृतिक वारसा यादीत स्थान मिळाले.
Tanya Mittal's Favourite Baklava Recipe
sakal
फायलो डफ शीट्स (Phyllo Dough Sheets) - रेडीमेड वापरा, अक्रोड (Walnuts), पिस्ता (Pistachios), साखर, बटर (Butter), दालचिनी पावडर, लवंग पावडर, मध (Honey).
Tanya Mittal's Favourite Baklava Recipe
Sakal
ओव्हन ३५० अंशांवर गरम करा. एका भांड्यात कुस्करलेले अक्रोड, पिस्ता, साखर, दालचिनी आणि लवंग पावडर एकत्र करा.
Tanya Mittal's Favourite Baklava Recipe
Sakal
बेकिंग पॅनवर बटर लावा,दोन-दोन फायलो ठेवून, प्रत्येक थरावर बटर लावा, अंदाजे १४ थर झाल्यावर, त्यावर तयार केलेले सुकामेव्याचे मिश्रण पसरवा.
Tanya Mittal's Favourite Baklava Recipe
Sakal
पुन्हा ५ थर (प्रत्येकावर बटर लावून) लावा. अक्रोडाचे मिश्रण पुन्हा पसरवा आणि त्यावर शेवटचा चौदावा थर लावा.बकलावा चौकोनी किंवा पतंगाच्या आकारात कापून घ्या. प्रीहीट केलेल्या ओव्हनमध्ये ४० ते ४५ मिनिटे बेक करा.
Tanya Mittal's Favourite Baklava Recipe
Sakal
एका भांड्यात साखर, पाणी, मध आणि लिंबाचा साल (Lemon Zest) घालून १० मिनिटे मंद आचेवर उकळवा. सरबत चिकट झाल्यावर गाळून घ्या आणि थोडे थंड होऊ द्या.
Sakal
गरम भाजलेल्या बकलावावर हे थंड सरबत ओता. यामुळे बकलावातील थर सिरप शोषून घेतात. तुमचा स्वादिष्ट थरांचा बकलावा तयार!
Sakal
Khare Shankarpali
Sakal