संतोष कानडे
सापांना त्यांच्या आसपासच्या हालचाली आणि वासाची जाणीव चांगली असते.
ते जीभ बाहेर काढून हवेतले रासायनिक कण गोळा करतात आणि अवयवातून त्यांचा अंदाज घेतात.
त्यामुळे एखाद्या माणसाचा वास सापाला परिचित होऊ शकतो.
मात्र साप माणसाला कुत्रा किंवा मांजरासारखं व्यक्ती म्हणून ओळखतो, याचे ठोस पुरावे नाहीत.
काही सापांना वारंवार दिसणाऱ्या व्यक्तीच्या उपस्थितीची सवय लागू शकते.
मात्र याचा अर्थ साप त्या व्यक्तीच्या चेहऱ्यावरुन किंवा नावाने ओळखतो, असा होत नाही. इतर पाळीव प्राणी नाव लक्षात ठेऊ शकतात.
सापांना दृष्टीपेक्षा वास, कंपन आणि शरीरातील उष्णता यांसारख्या संकेतांचा अधिक उपयोग होतो.
माणूस अचानक जवळ गेल्यास किंवा त्रास दिल्यास साप बचावासाठी हल्ला करू शकतो.
त्यामुळे साप एखाद्या व्यक्तीला मुद्दाम शोधून सूड घेण्यासाठी येतो, हा समज चुकीचा आहे.
tiger
esakal