सकाळ डिजिटल टीम
तुम्ही पीत असलेल्या चहामध्ये किंवा वापरत असलेल्या चहाच्या पावडरमध्येही भेसळ केली जाते. पावडरचे वजन जास्त भरण्यासाठी आणि चहाचा रंग गडद दिसण्यासाठी ही भेसळ होते.
Tea adulteration
Esakal
नव्या चहा पावडरमध्ये वापरलेली चहा पावडर मिसळली जाते. हॉटेल किंवा कंपन्यांमध्ये वापरल्यानंतर उरलेली चहाची पावडर वाळवून ती वापरली जाते.Tea adulteration
Tea adulteration
Esakal
चहाला आकर्षक आणि गडद काळा किंवा चॉकलेटी रंग यावा यासाठी रंग वापरला जातो. या रंगात हानिकारक रसायने असतात.
Tea adulteration
Esakal
चहाच्या पानांसारखाच रंग असलेल्या इतर किंवा निरुपयोगी झाडांची पानंही पावडरमध्ये वाळवून टाकली जातात.
Tea adulteration
Esakal
चहा पावडरचं वजन वाढवण्यासाठी त्यात बारीक लोखंडाचा कीस किंवा इतर कचरा जाणीवपूर्वक मिसळला जातो. असा चहा सतत प्यायल्याने पचनाच्या समस्या, यकृत, किडनीचे गंभीर आजार होण्याचा धोका असतो.
Tea adulteration
Esakal
ओल्या टिश्यू पेपरवर चमचाभर चहा पावडर घेऊन त्यावर पाणी शिंपडा. पेपरला चहाचा गडद लाल/केशरी डाग पडला, तर रंगाची भेसळ आहे.
Tea adulteration
Esakal
एका काचेच्या ग्लासमध्ये थंड पाणी घ्या आणि त्यात एक चमचा चहा पावडर टाका. चहा पावडर खरी असल्यास हळूहळू रंग सोडेल. मात्र चहा पाण्यात टाकताच गडद नारंगी किंवा लाल रंग झाला, तर बनावट पावडर आहे.
Tea adulteration
Esakal
काचेच्या ग्लासात चहा पावडर आणि लिंबाचा रस एकत्र करा. चहा शुद्ध असेल तर लिंबाचा रस पिवळा किंवा हिरवा होईल. पण कृत्रिम रंग असेल तर रंग नारंगी किंवा दुसरा दिसेल.
Tea adulteration
Esakal
चहाच्या पानांवरून एक चुंबक फिरवा. जर त्यात भेसळ असेल तर चुंबकाला लोखंडाचे बारीक कण चिटकलेले दिसतील.
Tea adulteration
Esakal