चहात बिस्किट बुडवून खाण्यास कधीपासून सुरूवात झाली ? रंजक इतिहास वाचून वाटेल आश्चर्य

Yashwant Kshirsagar

चहाप्रेमींचे वेड

भारतात चहाबद्दलचे प्रेम शब्दांत सांगता येत नाही. कडक उन्हाळ्यातही चहाच्या टपरीवर सर्वाधिक गर्दी असते. चहा हा केवळ पेय नाही, तर जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे.

Tea And Biscuits Tradition

|

esakal

दिवसाची सुरुवात चहाने

अनेक जण दिवसाची सुरुवात चहाच्या कपाने करतात. काहींना 'बेड टी' घेण्याचा आनंद असतो. नाश्त्यासोबत किंवा दुपारच्या जेवणानंतर चहा आनंद द्विगुणित करतो.

Tea And Biscuits Tradition

|

esakal

पावसाळ्यातील खास मजा

पावसाळ्याच्या दिवसांत गरम चहा आणि त्यासोबत काहीतरी खाणे ही अनुभूती अविस्मरणीय असते. चहा प्रत्येक क्षणाला विशेष बनवतो.

Tea And Biscuits Tradition

|

esakal

बिस्किट बुडवण्याची सवय

काही लोकांना नुसता चहा कमी वाटतो. त्यांना बिस्किट किंवा ब्रेड चहात बुडवून खाण्यात खरा आनंद येतो. ही पद्धत भारतीय संस्कृतीचा भाग बनली आहे.

Tea And Biscuits Tradition

|

esakal

बिस्किटाची चहात पहिली बुडी

ही प्रथा युरोपमध्ये १७व्या-१८व्या शतकात सुरू झाली. तेव्हा बिस्किटे खूप कडक असायची, म्हणून ती मऊ करण्यासाठी चहा, कॉफी किंवा दुधात बुडवली जाऊ लागली.

Tea And Biscuits Tradition

|

esakal

टी टाइम संस्कृती

ब्रिटनमध्ये 'टी टाइम' बहरली तेव्हा चहासोबत बिस्किटे वाढणे ही पद्धत पक्की झाली. हा ट्रेंड हळूहळू जगभर पसरला.

Tea And Biscuits Tradition

|

esakal

भारतात कधी रुजली पद्धत

ब्रिटिश वसाहत काळात भारतात चहा पिण्याची प्रथा वेगाने पसरली. त्यासोबतच बिस्किटे चहात बुडवून खाण्याची सवयही रुजली.

Tea And Biscuits Tradition

|

esakal

चवीमागील वैज्ञानिक कारण

बिस्किट चहात बुडवल्याने ते मऊ होते आणि चहाची चव त्यात मिसळते. यामुळे बिस्किटची चव अधिक खुलते आणि समाधानकारक वाटते.

Tea And Biscuits Tradition

|

esakal

आजही पद्धत कायम

आजही पारले-जी, मेरी, ग्लुकोज किंवा खारी बिस्किटे चहात बुडवून खाण्याची आवड कायम आहे. ही साधी सवय लाखो भारतीयांना भावते.

Tea And Biscuits Tradition

|

esakal

चहा-बिस्किटाचा जलवा कायम

आज कॉफी संस्कृती वाढली असली तरी चहा आणि बिस्किट यांच्या साध्या जोडीतला निखळ आनंद अद्यापही अनन्यसाधारण आहे.

Tea And Biscuits Tradition

|

esakal

जगातील सर्वात शांत गाव कुठे आहे माहित्ये का? अद्भुत अनुभवासाठी एकदा भेट द्याच

World's Peaceful Village

|

esakal

येथे क्लिक करा