पुजा बोनकिले
दरवर्षी २१ मे रोजी आंतरराष्ट्रीय चहा दिन साजरा केला जातो.
अनेकांची दिवसात सुरुवात ही एक कप चहाने होते.
विविध पद्धत पण तुम्हाला माहितीय का भारतासह जपान, इंग्लंड, तुर्की आणि चीन येथे चहा कसा बनवला जातो.
भारतात चहा प्यायल्याशिवाय दिवसाची सुरुवात होत नाही. इथे बनतो मसाला चहा – ज्यामध्ये टाकता दूध, पाणी, साखर, आलं आणि चहा पावडर वापरला जातो. हे सगळं छान उकळून एक दमदार आणि सुगंधी चहा तयार होतो.
जपानमध्ये बनतो मॅचा – म्हणजे ग्रीन टी पावडर. उकळत्या पाण्यात मॅचा टाकून बांबूच्या व्हिस्कने फेटून तयार होतो हा आरोग्यदायी चहा.
तर इंग्लडमध्ये बनवला जातो 'ब्लॅक टी' – उकळत्या पाण्यात टी बॅग किंवा टी लीव्हज टाकून त्यात थोडं दूध आणि साखर घालतात. काही जण दूध आधी कपात टाकतात, तर काही नंतर.
तुर्कीमध्ये चहा बनवण्यासाठी वापरतात खास दोन पात्रं – वरचं पात्र पानांसाठी आणि खाली पाणी उकळण्यासाठी. तयार झालेला गडद चहा पातळ करून काचेच्या ग्लासमध्ये साखरेसह सर्व्ह केला जातो.
चीनमध्ये खास पद्धतीने उकळलेलं पाणी आणि विविध प्रकारचे टी लीव्हज वापरून अनेक वेळा चहा ब्रू केला जातो. ग्रीन टी, ओलोंग, आणि पू-अर चहा येथे प्रसिद्ध आहेत.