टीम इंडियाचा कोच झालेल्या गंभीरचा खेळाडू म्हणून परफॉर्मन्स कसा?

Pranali Kodre

मुख्य प्रशिक्षक

बीसीसीआयने भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी 9 जुलै रोजी गौतम गंभीरची अधिकृतरित्या नियुक्ती केली आहे.

Gautam Gambhir | Sakal

पदभार स्विकार

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार गंभीर २७ जुलैपासून सुरू होणाऱ्या भारताच्या श्रीलंका दौऱ्यापासून पदभार स्वीकारेल.

Gautam Gambhir | Sakal

कार्यकाळ

गंभीरला बीसीसीआयने साडेतीन वर्षांसाठी म्हणजेच डिसेंबर २०२७ पर्यंत भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्त केले आहे.

Gautam Gambhir | Sakal

कसोटी कारकिर्द

गंभीरने त्याच्या कारकि‍र्दीत ५८ कसोटी सामने खेळले असून ४१.९५ च्या सरासरीने ४१५४ धावा केल्या आहेत. यात त्याने ९ शतके आणि २२ अर्धशतके केली आहेत.

Gautam Gambhir | X/ICC

वनडे कारकिर्द

त्याने १४७ वनडे सामने खेळले असून ३९.६८ सरासरीने ५२३८ धावा केल्या आहेत. यामध्ये त्यान ११ शतके आणि ३४ अर्धशतके केली आहेत.

Gautam Gambhir | X/ICC

आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्द

गंभीरने ३७ आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले असून ९३२ धावा केल्या आहेत, ज्यात ७ अर्धशतकांचा समावेश आहे.

Gautam Gambhir | X/ICC

आयपीएल

गंभीरने १५४ आयपीएल सामने खेळले असून ४२१८ धावा केल्या आहेत. यामध्ये ३६ अर्धशतके त्याने केली. त्याच्या नेतृत्वात २०१२ आणि २०१४ साली कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएलचे विजेतेपद जिंकले.

Gautam Gambhir | X/IPL

२३ वर्षीय अभिषेक शर्माचे दुसऱ्याच सामन्यात ४ मोठे विक्रम

Abhishek Sharma | Sakal
येथे क्लिक करा