शिवम दुबे T20I मध्ये भारतासाठी ठरतोय 'लकी'; आशिया कपमध्येही...

Pranali Kodre

शिवम दुबे

भारतीय क्रिकेट संघ सध्या आशिया कप २०२५ स्पर्धेत खेळत आहे.

Shivam Dube

|

Sakal

आशिया कपमध्ये पहिल्या दोन सामन्यात विजय

आशिया कप २०२५ मध्ये भारताने पहिल्या सामन्यात युएईला, तर दुसऱ्या सामन्यात पाकिस्तानला सहज पराभूत केले.

Shivam Dube

|

Sakal

शिवम दुबेची चर्चा

या विजयानंतर शिवम दुबेच्या एका विक्रमाची चर्चा सुरू आहे. या विक्रमाकडे पाहून तो भारतीय संघासाठी टी२० मध्ये लकी चार्म ठरत असल्याचे म्हटलं जातंय.

Shivam Dube

फक्त दोन सामन्यात पराभव

खरंतर शिवम दुबे आजपर्यंत त्याच्या कारकि‍र्दीत भारताकडून जेवढे टी२० सामने खेळला आहे, त्यातील त्याने फक्त दोन सामन्यात पराभव पाहिलेला आहे.

Shivam Dube

|

Sakal

३७ टी२० सामने

शिवम दुबे आत्तापर्यंत ३७ टी२० सामने भारतासाठी खेळेल आहेत, यातील त्याने २०१९ मध्ये कारकि‍र्दीच्या सुरुवातीच्या पाच सामन्यातच २ पराभव पाहिले होते. मात्र त्यानंतर गेल्या ३२ सामन्यात त्याने पराभव पाहिलेला नाही.

Shivam Dube

सलग ३२ सामन्यात अपराजीत

म्हणजेच शिवम दुबेने खेळलेल्या शेवटच्या ३२ सामन्यात भारताने पराभव पाहिलेला नाही. ३२ सामन्यांपैकी ३० सामने जिंकले आहेत, तर २ सामन्यांचा निकाल लागलेला नाही.

Shivam Dube

आंतरराष्ट्रीय कारकिर्द

दुबेच्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकि‍र्दीबाबत सांगायचे झाले, तर त्याने ३७ सामन्यांमध्ये ४ अर्धशतकांसह ५४१ धावा केल्या आहेत आणि १६ विकेट्स घेतल्या आहेत. तो २०२४ टी२० वर्ल्ड कप विजेत्या भारतीय संघाचाही भाग होता.

Shivam Dube

|

Sakal

इंजिनियर असलेले ६ भारतीय क्रिकेटपटू

Ravichandran Ashwin

|

Sakal

येथे क्लिक करा