Pranali Kodre
भारतीय क्रिकेट संघाला १४ जुलै रोजी लॉर्ड्स कसोटीत दुसऱ्या डावात १९३ धावांचा पाठलाग करताना इंग्लंडविरुद्ध केवळ २२ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला.
लॉर्ड्स कसोटीत १९३ धावांचा पाठलाग करताना भारताचा संघ चौथ्या डावात केवळ १७० धावांवरच सर्वबाद झाला.
यावरुन पुन्हा हे अधोरेखित झाले की गेल्या १२ वर्षांपासून भारतीय संघ कसोटीत चौथ्या डावात धावांचा पाठलाग करताना संघर्ष करत आहे.
भारताचा दिग्गज सचिन तेंडुलकर निवृत्त झाल्यापासून भारताने कसोटीत १५० पेक्षा अधिक धावांचा पाठलाग केवळ दोनदाच यशस्वीपणे केला आहे.
सामने - २६ | विजय - २ | पराभव - १७ | अनिर्णित - ७
ब्रिस्बेन कसोटी - २०२१ (विरुद्ध ऑस्ट्रेलिया)
रांची कसोटी - २०२४ (विरुद्ध इंग्लंड)
डिसेंबर २०१३ नंतर १५० + धावांचा पाठलाग करताना भारताची विजयाची टक्केवारी अव्वल ८ संघांमध्ये सर्वात वाईट आहे.