सकाळ डिजिटल टीम
एपीके (APK) नक्की आहे तरी काय?, यामुळे काय होतो तुम्हाला माहित आहे का?
एपीके (APK) म्हणजे काय आहे आणि यामुळे काय होते या बद्दल सविस्तर जाणून घ्या.
अँड्राईड पॅकेज कीट म्हणजेच ॲपची कच्ची फाइल
‘गुगल प्ले स्टोर’ सोडून जे ॲप्लिकेशन आपण थेट डाऊनलोड करतो, ते याच स्वरूपात असतात.
फ्री गेम्स, क्रॅट केलेले ॲप्स, व्हॉटसॲप गोल्ड, लोन ॲप्स, एआय फोटो फिल्टर याराख्या ॲप्लिकेशनचा यात समावेश होतो.
एखादी फायद्याची सरकारची मोफत काहीतरी योजनेच्या नावाखाली ही एपीके फाइल सायबर भामटे फिरवत असतात.
एखादा कुतूहल, आमिष किंवा अज्ञानामुळे या गोष्टींना भुलून डाऊनलोड करतो आणि यावर कडी म्हणजे ‘आलाऊ ऑल’ चे बटन दाबल्यावर चोराला घराची चावी देण्यासारखे होते.
या फाइल तुम्ही डाऊनलोड केल्यास तुमची फसवणूक होवू शकते.
आर्थिक दृष्टिकोनातून तसेच अन्य कोणत्याही प्रकारे तुम्हाला ब्लॅकमेल केले जावू शकते.