Apurva Kulkarni
तेजश्रीच्या पहिल्या सिनेमाच्या ऑफरचा किस्सा फार भन्नाट आहे.
तेजश्री जेव्हा कॉलेजमध्ये होती तेव्हा तिला सिनेमाची ऑफर आली. एवढ्या लवकर ऑफर येईल असं तिला वाटलंच नव्हतं.
एक दिवस ती घरात होती, तिला फोन आला आणि ती गोंधळली. तिला वाटलं कोणीतरी तिची मजा घेतय.
आईवडिलांसोबत बसून तिने फोन केला. तेव्हा तिला पटलं की, खरंच तिला ऑडिशनसाठी बोलावलं आहे.
जेव्हा ती ऑडिशनला गेली तेव्हा तिचं मन थोडं दडपलं होतं. 'मी हे करु शकते का' असा प्रश्न तिला पडला होता.
तेजश्रीने सांगितलं की, 'जेव्हा मी कॅमेऱ्यासमोर पहिल्यादा उभी राहिले तेव्हा माझे हात थरथरत होते. पण मनात एक वेगळाच आनंद होता'
तेजश्रीचा पहिला सिनेमा झेंडा हा होता. या चित्रपटातून तिच्या यशाची सुरुवात झाली.
आज तेजश्री एक आघाडीची कलाकार म्हणून प्रसिद्ध आहे. मालिकांमधून तसंच चित्रपटांमधून तिची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे.