Apurva Kulkarni
तेजश्री प्रधान हिचा खूप मोठा चाहता वर्ग आहे. तिने तिच्या अभिनयाच्या जोरावर एक वेगळा चाहता वर्ग निर्माण केला आहे.
नुकताच तिचं 'तेजश्री प्रधानच्या निवडक मुलाखती' नावाचं पुस्तक प्रकाशित झालं आहे.
सोशल मीडियावर पोस्ट करत तिने नवीन पुस्तक आल्याची आनंदाची बातमी दिली आहे.
दरम्यान पुस्तकातील एका मुलाखतीत तिने तिच्या पहिल्या अभिनयाबाबत सांगितलं.
तेजश्रीने शाळेत असताना चेटकिणीची भूमिका साकारली होती.
ती म्हणाली की, 'शाळेत असताना एका नाटकात मला झाडाच्या बाजूला मला चेटकिण म्हणून उभं केलं होतं.'
त्यानंतर तिने कॉलेजमध्ये असताना अनेक नाटकं केली. तिचा पहिला सिनेमा झेंडा हा होता.