Payal Naik
लोकप्रिय मराठी अभिनेत्री तेजश्री प्रधान हिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांना आपलंसं केलं.
तिने 'प्रेमाची गोष्ट' मालिका सोडल्यानंतर प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली होती.
कुणीही तेजश्रीची जागा घेऊ शकत नाही असं प्रेक्षकांचं म्हणणं आहे.
तेजश्री चाहत्यांची प्रचंड लाडकी आहे.
ती यापूर्वी अनेक मालिका आणि काही चित्रपटातही झळकली.
तेजश्रीच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यासाठी चाहते कायमच उत्सुक असतात.
तेजश्रीच्या वॉलपेपरवर कुणाचा फोटो आहे तुम्हाला ठाऊक आहे का?
तिने स्वतःचा किंवा आई-वडिलांचा फोटो वॉलपेपरवर ठेवलेला नाहीये.
तिने देवी सरस्वतीचा फोटो वॉलपेपरवर ठेवलाय.
एका कार्यक्रमादरम्यान तिचा हा वॉलपेपर पाहायला मिळाला होता.