kimaya narayan
अभिनेत्री तेजश्री प्रधान काही ना काही कारणामुळे चर्चेत असते.
तेजश्रीने अभिनेता शशांक केतकरशी लग्न केलं आणि वर्षाच्या आतच त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर तेजश्री अजूनही सिंगल आहे.
पण काही वर्षांपूर्वी व्हायरल झालेल्या फोटोमुळे एका अभिनेत्याशी नाव जोडलं गेलं.
तेजश्रीने काही वर्षांपूर्वी अगंबाई सासूबाई या मालिकेत काम केलं. यातील तिची आशुतोष पत्की बरोबरची जोडी अनेकांना आवडली.
त्यांचा बाईक राईडवरील फोटो व्हायरल झाला. ते दोघं रिलेशनशिपमध्ये असल्याच्या चर्चा त्यावेळी चाहत्यांमध्ये सुरु झाल्या.
पण प्रत्यक्षात तसं काहीही नव्हतं. आशुतोष आणि तेजश्री अजूनही एकमेकांचे चांगले मित्र आहेत. तसा खुलासा तिने एका मुलाखतीमध्ये केला.