Payal Naik
'होणार सून मी या घरची' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली लोकप्रिय अभिनेत्री तेजश्री प्रधान हिच्या मुलाखती सध्या प्रचंड गाजतायत.
त्यामुळेच तिच्या वैयक्तिक आयुष्याची देखील चर्चा रंगली आहे.
तिने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत घटस्फोटासाठी आपण शशांकला दोष देत नसल्याचं सांगितलं.
होणार सून मी... याच मालिकेच्या सेटवर ते दोघे प्रेमात पडले होते.
त्यांनी लग्नही केलं. मात्र वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला.
मात्र शशांकशी लग्नापूर्वी तेजश्रीचं लग्न एका दुसऱ्याच व्यक्तीसोबत ठरलं होतं.
न्यूज १८ लोकमतने दिलेल्या माहितीनुसार तेजश्रीचा साखरपुडा इंजिनियर असलेल्या राहुल डोंगरे यांच्याशी ठरला होता.
मात्र तेजश्री आणि शशांक यांचं प्रेमप्रकरण घरच्यांना समजल्यावर त्यांनी हा साखरपुडा मोडला होता
शशांकने घटस्फोटासाठी अर्ज केला होता. त्यात त्याने आपला मानसिक छळ होत असल्याचं म्हटलं होतं.